पंडीतजींना ‘भारतरत्न’ जाहीर झाले....कालच्या दिवसाची सर्वांत सुखद बातमी....
खरे सांगायचे तर हा सन्मान मुख्यत्वे त्या पुरस्काराचाच आहे, असे मला वाटते. तुम्ही सांगा, पंडीतजींना तो पुरस्कार मिळाला काय किंवा नाही मिळाला काय (शुभ बोल नार्या...), त्यांना किंवा त्यांच्या असंख्य चाहत्यांना काहीही फरक पडत नाही. पण, ‘भारतरत्न’ मिळालेल्या असामान्य व्यक्तींच्या यादीत जर "पं. भीमसेन जोशी" हे नाव नसेल, तर ती यादीच अपूर्ण आहे, असे वाटत राहते. खरे की नाही?
काय बोलणार मी त्यांच्यावर ? दोन गोष्टी आहेत, एक - माझी पात्रता नाही आणि दोन - माझी खरंच पात्रता नाही.
पंडीतजींनी आपली संगीतसाधना कशी सुरू केली, किती कष्ट उपसले...हे अस्सल सोने किती तावूनसुलाखून लखलखले आहे, हे सर्वजण जाणतातच...पण आज हिमालयापेक्षाही जास्त उच्चस्थानावर पोहोचलेला हा माणूस ज्यावेळी स्वतःला ‘भारतरत्न’ मिळाल्याची बातमी ऐकतो, तेव्हा ‘हा किराणा घराण्याचा सन्मान आहे.’ (माझा एकट्याचा नाही) असे त्यांना म्हणावेसे वाटते.
"विद्या विनयेन शोभते" याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण असू शकेल काय?
तुम्हीच सांगा....
स्वरभास्कराचा अस्त झाला... सूर पोरके झाले अन सूरदेवता पुत्रहीन...
ReplyDelete...पंडीतजी गेले.