
तर मी म्हणत होतो की दिवाळी आली, लोकांनी भरपूर Enjoy केले. काही रजा घेऊन गावी जाऊन आले (काही अजून यायचेत, ते आले की रस्ते परत भरतील), काही १-२ दिवसांच्या outing ला गेले, काहींनी tourist package घेतले वगैरे...
काहीजण मात्र इथेच थांबले...या वाक्यातल्या "इथेच" च्या जागी तुमच्या गावाचे नाव टाका, काही फरक पडत नाही. मुद्दा हा की या ‘काहीं’नी काय केले? वर वर्णन केलेल्या लोकांनी enjoy केले, यांनी नाही केले? ... याचे उत्तर ‘केले ना...’ असे आहे...म्हणजे काय काय केले, असे विचारले तर "निवांत विश्रांती घेतली", "भरपूर खरेदी केली", "खाल्लो, प्यालो, मजा केली", (note the underline) "खूप फटाके उडवले..." इ. उत्तरे मिळतील..अर्थातच, ही यादी खूप मोठी आहे, पण ही झाली प्रातिनिधीक उदाहरणे.
यातला शेवटचा प्रकार (फटाके) हा जरा त्रासदायक आहे...दोन कारणांसाठी; एक म्हणजे आमची कॉलनी बरीच दाटीवाटीची असल्याने घरात फटाके फुटताहेत असे मला सदैव वाटत होते. तरी आमच्या घरी लहान मूल, आजारी माणूस, ज्येष्ठ नागरीक असे कोणीही नाहीत. पण आवाजाचा त्रास इतका की धडधाकट माणसे पण आजारी पडावीत. हा एक Personal भाग झाला, आणि दुसरे म्हणजे बेदम कचरा...आज पहावे तिथे कागदाच्या कपट्यांचे ढीगच्या ढीग जमा झाले आहेत. जणू काही जगातला सगळा कागद आपल्या इथे आलाय असे वाटू लागते. भयंकर प्रमाणावर कागद पाहिला की मला तितकेच वाईट वाटते. कारण, कागदाचा थेट संबंध लाकडाशी, पर्यायाने झाडांशी येतो. ज्या प्रमाणात वाया गेलेला हा कागद, त्याच प्रमाणात (किंबहुना जास्त प्रमाणात) केली गेलेली, आणि अर्थातच वाया गेलेली वृक्षतोड असे समीकरण आहे...त्याचा जास्त त्रास होतो.
आपल्या लोकांची मनोवृत्ती काही कळत नाही, फटाके उडवा म्हणले तर एकाला दहा तयार होतात...पण वृक्षारोपण करायला मात्र शाळेतल्या मुलांना वेठीला धरावे लागते....तेही विद्यार्थी, शिक्षक यांच्या अनिच्छेनेच. चांगल्या गोष्टी जबरदस्तीने लादाव्या लागतात हे खरेच एक कोडे आहे. समाजाच्या जडणघडणीत काही basic problem आहे का काय? काही कळत नाही....
...खरंच काही कळत नाही.
No comments:
Post a Comment