सकाळी ऑफिसला जाताना थोडा लवकर निघालो. म्हटले, पाच दिवस चांगली सुट्टी झाली आहे तर थोडे जावे लवकर. Normally, माझे एखादी गोष्ट लवकर करण्याचे मनसुबे कधीच फळत नाहीत (...झोपेची अतोनात आवड, दुसरे काय!), पण आज ते जमले... त्यामुळे जाताना रहदारी कमी होती. मला वाटले, लवकर निघाल्यामुळे असेल. ऑफिसलाही मी अपेक्षेपेक्षा खूप लवकर पोहोचलो (३०-३५ मिनिटे एरवी, आज मोजून १७ मिनिटे), आणि पार्किंगवर नजर पडताच मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले...पार्किंग रिकामे!!! can't believe this!...इतक्या लोकांनी जोडून रजा टाकल्या असतील (आणि त्या approve झाल्या असतील) अशी कल्पना मी केलीच नव्हती... कमीअधिक प्रमाणात सर्व शहरभर हीच परिस्थिती होती, त्यामुळे रस्ते रिकामे होते...
...मग येताना मात्र मी याचा पुरेपूर आनंद घेतला. जे लोक पुण्याच्या सध्याच्या traffic ला तोंड देत आहेत, त्यांना लक्षात येईल की पुणे विद्यापीठ चौक १ मिनिटाच्या आत पार करणे हे काय सुख आहे! मला आठवते, मी सातवी-आठवीत असताना (१९९३-९४) रस्ते इतके मोकळे असत. गेल्या काही महिन्यांत असे रस्ते मी व्हिएन्नामध्ये असताना पाहिले होते.
Hopefully, उद्याही अशीच परिस्थिती असेल... सोमवारनंतर नेहमीचे युध्द सुरू होईलच..
...Aamen!
वा! असे दिवस वारंवार येवोत!
ReplyDeleteधन्यवाद अनिकेत, मी तुझ्या ब्लॉगला भेट देऊन गेलो, पण तिथे मला comment ची लिंक मिळाली नाही.
ReplyDelete