
दिवाळी हा माझा नेहमीच weak point राहिला आहे. काय तो लोकांचा उत्साह, काय ती खरेदी, फराळ, फटाके, सुट्टी, पहाटे (नको असताना) उठणे, अभ्यंगस्नान, सुगंधी तेल, उटणे, मामाच्या गावाला जाणे वगैरे गोष्टी दिवाळीसोबतच येतात. माझ्या सुदैवाने या सर्व गोष्टी मला अनुभवायला मिळतात.
त्यात काल लक्ष्मीपूजन झाले. दिवाळीच्या या बहारदार सणाचा परमोच्च बिंदू. या दिवशी तर म्हणजे कळस असतो तो संध्याकाळी. सगळ्यांनी सजायचे, चांगले नवीन कपडे घालून तयार व्हायचे आणि लक्ष्मीची पूजा करायची. आणि ही पूजा पण कशी असते, तर झेंडूची फुले, ऊस, खास लक्ष्मीपूजनासाठी मिळते ती ‘लक्षुमी’ नावाची छोटी झाडणी, आंब्याचे तोरण, दिव्यांची आरास, सोन्याचांदीचे दागदागिने, लखलखीत पूजासाहित्य, लाह्या, बत्तासे, मिठाई, आरती, नेवैद्य व या सगळ्यांच्या जोडीला अमाप उत्साह, अशी एकदम खास तयारी असते.
आमचेही लक्ष्मीपूजन काल झाले. गेल्या सहा महिन्यांत माझ्या २-३ परदेशवार्या घडल्याने काही Forex शिल्लक होते वेगवेगळ्या देशांचे (USD, Euro etc). मग एक भन्नाट कल्पना सुचली. म्हटले, यांना का ठेवू नये लक्ष्मीपूजनाला? मग आमच्या पारंपरिक लक्ष्मीसोबत यंदा ही ‘परदेशी’ लक्ष्मीपण पूजेत आली. त्यामुळे आमचे लक्ष्मीपूजन यावर्षी Multinational झाले. सोबतचा फोटो पहा. मजा आली एकूण.
लवकरच भेटू.
No comments:
Post a Comment