__________________________________

Friday

अत्यंत महत्त्वाचे!!!!

मित्रांनो एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे...

भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील

तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा... आणि खरं बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतोच ना... संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्तोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत व काही पाठ आहेत.

ही भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवून ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही

जेवढी जमत असेल तेवढी तरी ती वापरा आणि जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा (हा लेख त्यांना सुद्धा पाठवा)

2 comments:

  1. संस्कृत भाषा न कळणार्‍या लोकानी ती आपली दुसरी भाषा आहे असे लिहिणे हे ढोगीपणाचे ठरेल. स्तोत्रे म्हटली म्हणजे भाषा कळली असे म्हणणे खोटे आहे. एक तरी स्वरचित वाक्य संस्कृतमध्ये ज्याला लिहिता वा बोलता येणार नाही त्याने ती आपली दुसरी भाषा आहे असे कसे म्हणावे?
    संस्कृतचे प्रेम असणारानी ती टिकवण्यासाठी जरूर प्रयत्न करावे पण ते खोटेपणावर आधारित नसावे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद प्रभाकर, एकतर ही पोस्ट वाचल्याबद्दल व दुसरे आपले मत दिल्याबद्दल.

    तुमचा विचार अत्यंत योग्य आहे. पण मला वाटते की जर संस्कृतमध्ये वाक्य बनविता येणे म्हणजे संस्कृत भाषा येणे अशी अट सध्याच्या परिस्थितीत जरा कठीण आहे. स्तोत्रांचा किंवा मंत्रांचा थोडाफार अर्थ आपणा सर्वांना नक्कीच समजतो. "प्रणम्यम् शिरसा देवम्.." म्हणजे आपण देवाला नमस्कार करतोय हे आपल्याला कळते...सध्या तेवढे पुरेसे आहे. हा खोटेपणा तर नक्कीच नाही... असलाच तर कमीपणा आहे, तोही आपलाच व आपल्या भाषेबद्दलचाच...

    या विषयाची/उपक्रमाची माहिती मी खूप लोकांना प्रत्यक्षही दिली... तेव्हा असे समजले की बऱ्याच लोकांना आपल्याला संस्कृत भाषा वापरता येते, हेच माहीत नव्हते... रोजच्या रोज स्तोत्रे किंवा मंत्र म्हणत असूनसुद्धा... जेव्हा त्यांना हे समजावून सांगितले तेव्हा त्यांना ही जाणीव झाली.

    अशी जाणीव असणेच सध्या महत्त्वाचे आहे... कालांतराने यात सुधारणा होऊन लोक तुम्ही म्हणताय त्या स्थितीलाही येतील...

    ReplyDelete