आली आली म्हणेपर्यंत दिवाळी संपलीसुध्दा! कसे दिवस सरतात काही कळत नाही...( Actually, मी पहिल्यांदा ’कसे दिवस जातात’ असे लिहिणार होतो, पण त्याचा दुसराही एक अर्थ होतो म्हणून रद्द केले...शीः, वात्रटच आहे मेला! असो.)
तर मी म्हणत होतो की दिवाळी आली, लोकांनी भरपूर Enjoy केले. काही रजा घेऊन गावी जाऊन आले (काही अजून यायचेत, ते आले की रस्ते परत भरतील), काही १-२ दिवसांच्या outing ला गेले, काहींनी tourist package घेतले वगैरे...
काहीजण मात्र इथेच थांबले...या वाक्यातल्या "इथेच" च्या जागी तुमच्या गावाचे नाव टाका, काही फरक पडत नाही. मुद्दा हा की या ‘काहीं’नी काय केले? वर वर्णन केलेल्या लोकांनी enjoy केले, यांनी नाही केले? ... याचे उत्तर ‘केले ना...’ असे आहे...म्हणजे काय काय केले, असे विचारले तर "निवांत विश्रांती घेतली", "भरपूर खरेदी केली", "खाल्लो, प्यालो, मजा केली", (note the underline) "खूप फटाके उडवले..." इ. उत्तरे मिळतील..अर्थातच, ही यादी खूप मोठी आहे, पण ही झाली प्रातिनिधीक उदाहरणे.
यातला शेवटचा प्रकार (फटाके) हा जरा त्रासदायक आहे...दोन कारणांसाठी; एक म्हणजे आमची कॉलनी बरीच दाटीवाटीची असल्याने घरात फटाके फुटताहेत असे मला सदैव वाटत होते. तरी आमच्या घरी लहान मूल, आजारी माणूस, ज्येष्ठ नागरीक असे कोणीही नाहीत. पण आवाजाचा त्रास इतका की धडधाकट माणसे पण आजारी पडावीत. हा एक Personal भाग झाला, आणि दुसरे म्हणजे बेदम कचरा...आज पहावे तिथे कागदाच्या कपट्यांचे ढीगच्या ढीग जमा झाले आहेत. जणू काही जगातला सगळा कागद आपल्या इथे आलाय असे वाटू लागते. भयंकर प्रमाणावर कागद पाहिला की मला तितकेच वाईट वाटते. कारण, कागदाचा थेट संबंध लाकडाशी, पर्यायाने झाडांशी येतो. ज्या प्रमाणात वाया गेलेला हा कागद, त्याच प्रमाणात (किंबहुना जास्त प्रमाणात) केली गेलेली, आणि अर्थातच वाया गेलेली वृक्षतोड असे समीकरण आहे...त्याचा जास्त त्रास होतो.
आपल्या लोकांची मनोवृत्ती काही कळत नाही, फटाके उडवा म्हणले तर एकाला दहा तयार होतात...पण वृक्षारोपण करायला मात्र शाळेतल्या मुलांना वेठीला धरावे लागते....तेही विद्यार्थी, शिक्षक यांच्या अनिच्छेनेच. चांगल्या गोष्टी जबरदस्तीने लादाव्या लागतात हे खरेच एक कोडे आहे. समाजाच्या जडणघडणीत काही basic problem आहे का काय? काही कळत नाही....
...खरंच काही कळत नाही.
__________________________________
Friday
दिवाळीचे Aftermaths - भाग १
Labels:
aftermath,
deepawali,
dipawali,
divali,
Diwali,
environment,
green,
marathi blog,
people,
trees
Thursday
मोकळे रस्ते....
मला कालपर्यंत जर कुणी सांगितले असते, की आज पुण्यात तुला मोकळे रस्ते पहायला आणि अनुभवायला मिळतील, तर मी त्याला/तिला अक्षरशः वेड्यात काढले असते. पण हे घडले आहे आज... ऐन officetime मध्ये आज पुण्यातले रस्ते ९०% हून अधिक रिकामे होते.
सकाळी ऑफिसला जाताना थोडा लवकर निघालो. म्हटले, पाच दिवस चांगली सुट्टी झाली आहे तर थोडे जावे लवकर. Normally, माझे एखादी गोष्ट लवकर करण्याचे मनसुबे कधीच फळत नाहीत (...झोपेची अतोनात आवड, दुसरे काय!), पण आज ते जमले... त्यामुळे जाताना रहदारी कमी होती. मला वाटले, लवकर निघाल्यामुळे असेल. ऑफिसलाही मी अपेक्षेपेक्षा खूप लवकर पोहोचलो (३०-३५ मिनिटे एरवी, आज मोजून १७ मिनिटे), आणि पार्किंगवर नजर पडताच मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले...पार्किंग रिकामे!!! can't believe this!...इतक्या लोकांनी जोडून रजा टाकल्या असतील (आणि त्या approve झाल्या असतील) अशी कल्पना मी केलीच नव्हती... कमीअधिक प्रमाणात सर्व शहरभर हीच परिस्थिती होती, त्यामुळे रस्ते रिकामे होते...
...मग येताना मात्र मी याचा पुरेपूर आनंद घेतला. जे लोक पुण्याच्या सध्याच्या traffic ला तोंड देत आहेत, त्यांना लक्षात येईल की पुणे विद्यापीठ चौक १ मिनिटाच्या आत पार करणे हे काय सुख आहे! मला आठवते, मी सातवी-आठवीत असताना (१९९३-९४) रस्ते इतके मोकळे असत. गेल्या काही महिन्यांत असे रस्ते मी व्हिएन्नामध्ये असताना पाहिले होते.
Hopefully, उद्याही अशीच परिस्थिती असेल... सोमवारनंतर नेहमीचे युध्द सुरू होईलच..
...Aamen!
Wednesday
Multinational लक्ष्मीपूजन
दिवाळी हा माझा नेहमीच weak point राहिला आहे. काय तो लोकांचा उत्साह, काय ती खरेदी, फराळ, फटाके, सुट्टी, पहाटे (नको असताना) उठणे, अभ्यंगस्नान, सुगंधी तेल, उटणे, मामाच्या गावाला जाणे वगैरे गोष्टी दिवाळीसोबतच येतात. माझ्या सुदैवाने या सर्व गोष्टी मला अनुभवायला मिळतात.
त्यात काल लक्ष्मीपूजन झाले. दिवाळीच्या या बहारदार सणाचा परमोच्च बिंदू. या दिवशी तर म्हणजे कळस असतो तो संध्याकाळी. सगळ्यांनी सजायचे, चांगले नवीन कपडे घालून तयार व्हायचे आणि लक्ष्मीची पूजा करायची. आणि ही पूजा पण कशी असते, तर झेंडूची फुले, ऊस, खास लक्ष्मीपूजनासाठी मिळते ती ‘लक्षुमी’ नावाची छोटी झाडणी, आंब्याचे तोरण, दिव्यांची आरास, सोन्याचांदीचे दागदागिने, लखलखीत पूजासाहित्य, लाह्या, बत्तासे, मिठाई, आरती, नेवैद्य व या सगळ्यांच्या जोडीला अमाप उत्साह, अशी एकदम खास तयारी असते.
आमचेही लक्ष्मीपूजन काल झाले. गेल्या सहा महिन्यांत माझ्या २-३ परदेशवार्या घडल्याने काही Forex शिल्लक होते वेगवेगळ्या देशांचे (USD, Euro etc). मग एक भन्नाट कल्पना सुचली. म्हटले, यांना का ठेवू नये लक्ष्मीपूजनाला? मग आमच्या पारंपरिक लक्ष्मीसोबत यंदा ही ‘परदेशी’ लक्ष्मीपण पूजेत आली. त्यामुळे आमचे लक्ष्मीपूजन यावर्षी Multinational झाले. सोबतचा फोटो पहा. मजा आली एकूण.
लवकरच भेटू.
Tuesday
॥ श्री गणेशाय नमः ॥
"श्री गणेशाय नमः" या वंदनाने सुरू केलेली कोणतीही गोष्ट चांगलीच होते, अशी माझी श्रध्दा आहे. त्यामुळे ब्लॉगिंगचा श्रीगणेशा करताना मला हेच वंदन सर्वात योग्य वाटले.
’शब्दसौख्य’ याचा अर्थ खरेतर मी व्यवस्थितपणे सांगू शकेन किंवा समजावून देईन याची मलाच खात्री नाही. माझा पहिला try होता तो ‘शब्दसख्य’ या नावाला. But, name availability is the biggest factor. सुदैवाने, मराठी ब्लॉग तसे संख्येने कमी आहेत त्यामुळे विशेष अधिक प्रयत्न न करावे लागता मला माझ्या ब्लॉगचे नाव मिळाले (आणि नंतर ‘शब्दसख्य’ पेक्षा मला ‘शब्दसौख्य’ हे नाव उजवे वाटले).
आता इथेच थांबतो. लवकरच भेटू पुन्हा...
Labels:
ganesha,
marathi blog,
shree ganesh,
start,
vandan,
सुरूवात
Subscribe to:
Posts (Atom)