__________________________________

Friday

दर्जा (भाग १)

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली. बहुधा 'टाइम्स' असावा. त्यात असे लिहिले होते की '95% of the computer engineers produced by India's mediocre engineering colleges are not fit for software development'

कदाचित तुम्हीसुद्धा वाचली असेल. 

...वाईट वाटलं. 

कोणत्यातरी एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीने काढलेला हा निष्कर्ष आहे. त्यांनी यासाठी एक विशिष्ट चाचणी/परीक्षा तयार केली होती व जवळजवळ ४००० सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सना त्या परीक्षेला बसवले आणि त्याचे जे काही 'निकाल' आले  त्याचे सार म्हणजे वरील 'statement'

वाईट याचे आहेच की ९५% संगणक अभियंते हे त्यांच्या कामाला सुयोग्य नाहीत, परंतु त्याहीपेक्षा वाईट हे आहे की या बातमीत सरसकट सर्व भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना 'mediocre' म्हणजेच 'अतिसामान्य' असे म्हटले गेले. 

इंजिनीरिंग कॉलेजेसची जर ही दशा, तर इतर शाखांचेही असेच काहीसे असणार, असा एक विचार तत्क्षणी माझ्या मनात चमकून गेला. 

कोणे एके काळी आपला देश हा इथल्या शिक्षणव्यवस्थेसाठी जगात नाव राखून होता. ती स्थिती तर कधीच इतिहासजमा झाली. पण आता मुलामुलींना पदवीचे शिक्षणही चांगले व दर्जेदार मिळू नये हे मोठेच दुर्दैव होय. 

चांगले अभियंते जर एखाद्या देशाला पैदा करता येत नसतील तर त्या देशाचा विकास होणार कसा व करणार कोण?

यात आणखी एक महत्त्वाचा भाग असा की, आज भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 'software development and export' चा मोठा वाट आहे. या क्षेत्रावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. इथे जर काम करणारे लोक 'unfit for duty ' असतील तर ही बाब आपल्या धोरणकर्त्यांना नक्कीच चिंतनीय आहे. 

काही महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्ताने मी युरोपमध्ये होतो. तिथल्या लोकांशी बोलताना एकाने असे सांगितले की त्याचे निरीक्षण असे आहे की पाकिस्तानी अभियंते हे भारतीय अभियंत्यांपेक्षा जास्त चांगले असतात. त्याहीवेळी मी असाच चमकलो होतो. मी त्याला थोडे खोलात जाऊन विचारले की का बाबा तू असं म्हणतोस, तर त्यावर त्याचे उत्तर असे होते की भारतीय इंजिनिअर्स हे त्यांच्या क्षेत्रात कच्चे व फार पुस्तकी असतात, त्यांना एखादी समस्या सांगितली तर केवळ आधी केल्याप्रमाणे ते त्याचे उत्तर सांगतील. आणि तशी समस्या त्यांनी जर आधी सोडवली नसेल तर मात्र ते सरळ 'I don't know' म्हणून मोकळे होतात. त्यांच्या उत्तरामध्ये सरधोपटपणा खूपच असतो. त्याऐवजी तीच समस्या एखादा पाकिस्तानी इंजिनीअर मात्र विविध पद्धतीने विचार करून 'creatively' सोडवतो असे त्याचे मत होते. 

असो. माझ्या या युरोपिअन मित्राचे मत म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाही. मात्र लोकांचे असे मत असणे हेही काही चांगले लक्षण नाही. (विशेषतः पाकिस्तानी इंजिनीअर्स?? shattt !@#!$... )

असंच  मागे एकदा मी आमच्या एका चुलत ओळखीच्या एका मुलीशी बोलत होतो. (खुलासा - चुलत ओळख म्हणजे ओळखीच्या व्यक्तीशी ओळख असलेली अनोळखी व्यक्ती). ही मुलगी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. मी तिला विचारले की बुवा तुम्ही जे सॉफ्टवेअर तयार करता, त्याचे प्रोग्रॅम लिहायला फार वेळ लागतो का?तर ती अगदी सहजपणे ती सांगत होती, "अरे, नाही काही.. गूगल आहे ना.. आपल्याला पाहिजे तो कोड शोधायचा किंवा कुठल्यातरी फोरममध्ये विचारायचा.. इतर लोक आख्खा प्रोग्रॅम लिहून देतात जवळजवळ.. मग तो आपण कॉपी-पेस्ट करायचा. झालं ... आमच्या टीम मधले सगळे असंच करतात. "

मला त्यावेळी तिचे हे उत्तर 'smart ' वाटले होते. आता त्यातला फोलपणा लक्षात येतोय ... आमच्या लोकांना जर कॉपी-पेस्टचीच सवय लागली असेल तर मग इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. 

वरील बातमीच्या निमित्ताने ही आठवण परत उजळली. 

हे असं  का असावं? किती कारणे असतील अशा परिस्थितीची? या सगळ्यांचे काही मूलभूत कारण असेल का? यावर काही करता येईल का? असे अनेक प्रश्न सध्या माझ्या मनात येत आहेत... 

(क्रमश:)

No comments:

Post a Comment