__________________________________

Wednesday

महाराष्ट्र निवडणूक प्रा. लि.

(लवकरच महाराष्ट्रात निवडणूका होऊ घातल्या आहेत...राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांची धावपळ चालू आहे...त्याचाच एक भाग आम्ही इथे प्रसृत करत आहोत.)

(’माननीय’ भाऊ सकाळी सकाळी पेपर वाचत असताना, ’सायब्या’ हा त्यांचा ’उजवा हात’ येतो....चेहरा पडलेला)
"नमस्कार भाऊ....येऊ का?"

"कोन रं??...आरं सायब्या का? ये की...आन्‌ आसं खेटरानं मारल्यागत का त्वांड झालय?"

(...आत येतो)

"भाऊ...आपल्या मतदारसंघात यंदा काय खरं न्हाई...."

"का? काय झालं??"

"लई वाईट परस्थिती हाये...लोकं लई प्रश्न करत्यात...कायबी इसरलेली न्हाईत."

"कसले प्रश्न? ...आन्‌ काय इसरायचं व्हतं??"

"आवो...आपन गेल्या निवडनुकीत...हाऽऽ येवढा जाहीर्नामा केल्ता...इरोधी उमेदवाराची आय-भैन काड्लीती...हाय का ध्यानात...?"

"....हाये तर...लई मज्जा आली व्हती....त्यामुळंच तर सलग ६ व्यांदा जिकलो न्हाई का?...पन आता काय हाय त्याचं?"

"हा....त्येच तर...लोकं म्हनत्यात, की काय फायदा तुमाला निवडल्याचा? काय केलं तुमी पाच वर्षात...आता आमी मत देनार न्हाई..."

"मत देनार न्हाई म्हंजे?"

"...तुमाला मत देनार न्हाईत."

"मग कुनाला देनार....त्या लाल्तोंड्या कावळ्याला का?"

"आवो भाऊ...आता निवड्नुकीत तरी जपून बोला की राव...आसं नवख्या मानसागत का करताय? आता भिंतिलाबी कान फुटत्यात..."

"आरं येवढ टेंनसन कशापायी घेतो? आपली काय मान्सं न्हाईत का, पैका न्हाई का...आपन न्हेमी काय करतो, ठावं नाई का तुला? चार दिवस आधी सगळ्या वस्त्या फिरा...लाल गांधी (रू १०००) वाटा...दारू पाजा...सगळी मोकळीक हाये की तुमाला...जेंना प्रश्न पडत्यात...ते येत न्हाईत मतदानाला...आपला मतदार बंगल्यात किंवा फलॅटमदी न्हाई राहात...झोपड्या अन्‌ वस्त्यांतून र्‍हातो...त्याचा म्हंजे हिशोब दोन दिवसाची दारू अन्‌ येक नोट...फिनिस. आता ह्ये सगळं का उगळवतोय माझ्याकडून?"

"आवो भाऊ....त्येच तर लफडं हाये ना? ...आता काय सांगाव तुमाला?"

(भाऊंचा चेहरा जरा चिंतेचा...प्रॉब्लेम मोठा असावा अशा समजुतीने)
"..कसलं लफडं??"

"..आवो, पाच वर्ष तुमी निस्ती जिवाची म्हमई केली...हितं काय चाललय, ठावं हाये का?"

(भाऊ भडकतात...)
" ए भाड्या, आता बोलतो का घालू तुला? तुझ्या आXX, तुला काय त्या कावळ्यानं धाड्लं का रं ?? गप मुद्‌द्याचं बोल...मी काय केलं तेचा पाढा नगं वाचू.."

(सायब्या जरा वरमून....)
"आवो भाऊ...पाच वर्सात वस्त्या समद्या बदलल्यात...समदी भायेरची मान्सं भरलीयात..."

"आन्‌ मग आपली मान्स कुटं गेली???"

"ती तर कुटं आपली व्हती....ही आल्यावर ती उलथली कुटंतरी..."

"आन्‌ मंग तुमी काय चिंचोके खेळत व्हता व्हय रं ?? पकापका बोलायला बरं जमतय..." (...अजून मघाचा राग शांत झालेला नाही) "....बर ते र्‍हायलं...आता ह्यांना द्या की आपलं मटेरीयल...ही देतील मतं आपल्याला..."

"...न्हाई भाऊ. ह्येंचा नेता येगळा हाय? आन्‌ तो पन आपन जे करतोय...तेच करतोय...वर तो पडला त्यांचा गाववाला..जातवाला. त्यामुळं सगळं पब्लिक तेच्या बाजूनं हाय...त्यानं पाच वर्सात भारी सेटींग केलीया...राशन्कार्ड, मतदार ओळखपत्र, सगळं मिळवून दिलं ना त्यानं ह्या लोकांना..."

"...तुमच्या माXX, तुमी का न्हाई केलं हे सगळं....निस्ते कुxxx हात हापटत का बसलात? आन्‌ आता कसं समजलं अचानक???

(सायब्या पहिला प्रश्न टाळून....खालमानेनं)
"आता प्रचाराला फिरायला सुरू केलं न्‌ मंग कळलं..."

"म्हंजे भोसXX, तुमीपन साले हित मजा करत बसला...मला शिकिव्तोय हXXXX..."

"भाऊ...आता काय करायचं???"

(एकंदर परिस्थिती भाऊंच्या लक्षात येते...)
"म्हंजे...पयले तुमी वस्त्यांतून फिरलात...तिथं कुत्र इचारत न्हाई म्हणल्यावर बोंबलत सोसायट्यांत गेला...तरी म्हणलं याला कोण प्रश्न इचारतंय?"

(सायब्याचं अवसान संपते...)
"भाऊ आवो आता खरंच कायबी खरं न्हाई..."

(भाऊ विचारात पड्तात...त्यांनाही संकटाची चाहूल लागते)
"एक काम कर...आता तोंड काळं कर हितनं.....ये उद्याच्याला...मी जरा इचार करतो यावर...तुमची राड निस्तरायला पायजेलच की आता...."

(सायब्या जातो.....)
_________________________________
उर्वरीत संवाद आणि भाऊंचे सोल्युशन उद्याच्या लेखात.
-----------------------------------------------


☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
हा ब्लॉग The Money Tree" यांनी प्रायोजित केलेला आहे.
☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻

2 comments:

  1. मस्त..

    म्हंजे माला भाष्या लैय अवाडली तुमची .. बरका..

    ReplyDelete
  2. शाब्बास अशुतोश....

    ReplyDelete