__________________________________

Showing posts with label divali. Show all posts
Showing posts with label divali. Show all posts

Saturday

दिवाळीचे Aftermaths - भाग २

काल Aftermaths मध्ये थोडे दुःख व्यक्त करून झाले, आज काही मजेदार आणि सुखद गोष्टी पाहू.

दिवाळी आली की आमचे डॉक्टरकाका खूष असतात. कारण उघड आहे; दिवाळीमध्ये किंवा better said दिवाळीनंतर लोकांच्या तब्येती बिघडायला सुरू होते. बदललेली हवा, थंडी या गोष्टी आहेतच, परंतु भरपूर आग्रहाला बळी पडून केलेला बेदम फराळ हे मुख्य कारण आहे. काका म्हणतात, की काही वर्षापूर्वी केवळ फराळ आणि त्यामुळे झालेले विविध परिणाम या केसेस असत. आता मात्र यात (सुध्दा) Variety आलेली आहे. म्हणजे कसे, तर सुमारे १० वर्षापूर्वी त्यांच्याकडे दिवाळीनंतर जे पेशंट येत, त्यांत मुख्यतः अपचन ही तक्रार असे, त्यानंतर घसा बसणे, सर्दी यांच क्रमांक असायचा. आज अपचन आपले स्थान टिकवून आहे, मात्र डोकेदुखी, कानदुखी आणि किरकोळ भाजणे (पुन्हा फटाके..दुसरे काय) यांनी घसा आणि नाक यांना मागे टाकले आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे. त्यांची ही Comparison ऐकून मला तर फारच मौज वाटली.


दिवाळीनंतरचे काही दिवस हे दिवाळी अंकांचे असतात. सुटीच्या दिवशी दुपारी मस्त जेवण करावे आणि पलंगावर लोळत एखादा "आवाज", "जत्रा", "किस्त्रीम" किंवा "किशोर" वाचावा हे एक फार सुंदर वास्तव आहे. सोबत तोंडात टाकायला शिल्लक राहिलेला फराळ असतोच. हे अंक भरपूर मोठे असल्याने ते संपवण्यात एखाददोन महिने सहज जातात. दिवाळी अंकांचे वाचन हा आपल्या मध्यमवर्गी शहरी मराठी संस्कृतीचाच एक भाग बनलेला आहे.


असो. आता दिवाळी संपलेली आहे. उद्यापासून इतर विषयांकडे वळावे.


उद्या भेटूच परत...

Friday

दिवाळीचे Aftermaths - भाग १

आली आली म्हणेपर्यंत दिवाळी संपलीसुध्दा! कसे दिवस सरतात काही कळत नाही...( Actually, मी पहिल्यांदा ’कसे दिवस जातात’ असे लिहिणार होतो, पण त्याचा दुसराही एक अर्थ होतो म्हणून रद्द केले...शीः, वात्रटच आहे मेला! असो.)



तर मी म्हणत होतो की दिवाळी आली‍, लोकांनी भरपूर Enjoy केले. काही रजा घेऊन गावी जाऊन आले (काही अजून यायचेत, ते आले की रस्ते परत भरतील), काही १-२ दिवसांच्या outing ला गेले, काहींनी tourist package घेतले वगैरे...


काहीजण मात्र इथेच थांबले...या वाक्यातल्या "इथेच" च्या जागी तुमच्या गावाचे नाव टाका, काही फरक पडत नाही. मुद्दा हा की या ‘काहीं’नी काय केले? वर वर्णन केलेल्या लोकांनी enjoy केले, यांनी नाही केले? ... याचे उत्तर ‘केले ना...’ असे आहे...म्हणजे काय काय केले, असे विचारले तर "निवांत विश्रांती घेतली", "भरपूर खरेदी केली", "खाल्लो, प्यालो, मजा केली", (note the underline) "खूप फटाके उडवले..." इ. उत्तरे मिळतील..अर्थातच, ही यादी खूप मोठी आहे, पण ही झाली प्रातिनिधीक उदाहरणे.


यातला शेवटचा प्रकार (फटाके) हा जरा त्रासदायक आहे...दोन कारणांसाठी; एक म्हणजे आमची कॉलनी बरीच दाटीवाटीची असल्याने घरात फटाके फुटताहेत असे मला सदैव वाटत होते. तरी आमच्या घरी लहान मूल, आजारी माणूस, ज्येष्ठ नागरीक असे कोणीही नाहीत. पण आवाजाचा त्रास इतका की धडधाकट माणसे पण आजारी पडावीत. हा एक Personal भाग झाला, आणि दुसरे म्हणजे बेदम कचरा...आज पहावे तिथे कागदाच्या कपट्यांचे ढीगच्या ढीग जमा झाले आहेत. जणू काही जगातला सगळा कागद आपल्या इथे आलाय असे वाटू लागते. भयंकर प्रमाणावर कागद पाहिला की मला तितकेच वाईट वाटते. कारण, कागदाचा थेट संबंध लाकडाशी, पर्यायाने झाडांशी येतो. ज्या प्रमाणात वाया गेलेला हा कागद, त्याच प्रमाणात (किंबहुना जास्त प्रमाणात) केली गेलेली, आणि अर्थातच वाया गेलेली वृक्षतोड असे समीकरण आहे...त्याचा जास्त त्रास होतो.


आपल्या लोकांची मनोवृत्ती काही कळत नाही, फटाके उडवा म्हणले तर एकाला दहा तयार होतात...पण वृक्षारोपण करायला मात्र शाळेतल्या मुलांना वेठीला धरावे लागते....तेही विद्यार्थी, शिक्षक यांच्या अनिच्छेनेच. चांगल्या गोष्टी जबरदस्तीने लादाव्या लागतात हे खरेच एक कोडे आहे. समाजाच्या जडणघडणीत काही basic problem आहे का काय? काही कळत नाही....


...खरंच काही कळत नाही.

Wednesday

Multinational लक्ष्मीपूजन






दिवाळी हा माझा नेहमीच weak point राहिला आहे. काय तो लोकांचा उत्साह, काय ती खरेदी, फराळ, फटाके, सुट्टी, पहाटे (नको असताना) उठणे, अभ्यंगस्नान, सुगंधी तेल, उटणे, मामाच्या गावाला जाणे वगैरे गोष्टी दिवाळीसोबतच येतात. माझ्या सुदैवाने या सर्व गोष्टी मला अनुभवायला मिळतात. 

त्यात काल लक्ष्मीपूजन झाले. दिवाळीच्या या बहारदार सणाचा परमोच्च बिंदू. या दिवशी तर म्हणजे कळस असतो तो संध्याकाळी. सगळ्यांनी सजायचे, चांगले नवीन कपडे घालून तयार व्हायचे आणि लक्ष्मीची पूजा करायची. आणि ही पूजा पण कशी असते, तर झेंडूची फुले, ऊस, खास लक्ष्मीपूजनासाठी मिळते ती ‘लक्षुमी’ नावाची छोटी झाडणी, आंब्याचे तोरण, दिव्यांची आरास, सोन्याचांदीचे दागदागिने, लखलखीत पूजासाहित्य, लाह्या, बत्तासे, मिठाई, आरती, नेवैद्य व या सगळ्यांच्या जोडीला अमाप उत्साह, अशी एकदम खास तयारी असते.

आमचेही लक्ष्मीपूजन काल झाले. गेल्या सहा महिन्यांत माझ्या २-३ परदेशवार्‍या घडल्याने काही Forex शिल्लक होते वेगवेगळ्या देशांचे (USD, Euro etc). मग एक भन्नाट कल्पना सुचली. म्हटले, यांना का ठेवू नये लक्ष्मीपूजनाला? मग आमच्या पारंपरिक लक्ष्मीसोबत यंदा ही ‘परदेशी’ लक्ष्मीपण पूजेत आली. त्यामुळे आमचे लक्ष्मीपूजन यावर्षी Multinational झाले. सोबतचा फोटो पहा. मजा आली एकूण. 


लवकरच भेटू.