__________________________________

Wednesday

पुनश्च एकदा हरी ओम...

....एक वर्ष, दोन महिने आणि वर काही दिवस झाले या गोष्टीला... स्वतःहून काही लिहिले, असे गेल्यावर्षी घडले होते. त्यानंतर रुटीनचे रहाटगाडगे चालू राहिले, दिवसांवर दिवस जात राहिले, आणि मी.. आज लिहू, उद्या लिहू असे म्हणत दिवस ढकलत राहिलो...

काळ कसा सरकतो आहे हे समजलेच नाही...

अर्थात, मी काही लिहिले नाही याचा अर्थ मी या गोष्टीला पूर्ण विसरलो असा नव्हता बरं का!  केवळ मी "लिहिता" नव्हतो गेले वर्षभर इतकेच.. अन्यथा लिखाणाची आठवण मला रोज होत असे... (हशा!) अनेक वेळा मी, हा अस्सा इथे कॉम्प्युटरसमोर येऊन बसलो लिहायचे म्हणून... आणि फक्त Facebook चे अकौंट बघून रेंगाळलो.. (पुन्हा हशा!).. आणि मग रात्री एक-दोन वाजता कुठे ब्लॉग पोस्ट करत बसणार ना.. समझा करो यार! (टाळ्या व शिट्या..)

असो, मनोगत खूप झाले... आता यावेळेपासून जरा वेगळे काही बोलूयात... काही वेगळ्या विषयांवर लिहूयात.. त्यामुळे लवकरच परत येत आहे.. नव्या दमाने, नव्या जोशाने... "शब्द्सौख्य" पुन्हा आपल्या सर्वांना भेटायला...No comments:

Post a Comment